बारामती (प्रतिनिधी) – बारामती परिसरातील आरोग्य सेवेला मदत होणेसाठी सामाजिक बांधिलकी जपत डिमेक नातू फौंडेशन व डिमेक कंपनीने बारामती महिला हॉस्पिटलला रुग्णवाहिका भेट दिले आहे.
प्रांत अधिकारी एम.आय.डी.सी कार्यालय बारामती व बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज यांचे आव्हानाला प्रतिसाद देत डिमेक फौंडेशन पुणे व डेक्कन मेकॅनिकल आणि केमीकल कंपनी ( डिमेक) एम. आय. डी. सी बारामती यांनी महिंद्रा कंपनीची सुसज्ज रुग्णवाहिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते महिला रुग्णालचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भोई यांचेकडे सुपुर्त केली.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, एम. आय. डी. सी उप अभियंता शुभम पाटील , डॉ.सदानंद काळे, डिमेक कंपनीचे वरिष्ठ महाप्रबंधक युवराज काळे, उप महाप्रबंधक निलेश आंदळकर , संभाजी होळकर, बरामाती नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव, बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच यावेळी डिमेक नातू फौंडेशन व डिमेक कंपनीच्या चेअरमन प्रभा नातू व डिमेक कंपनी उपाध्यक्ष नागेश कोरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले.