नगर, (प्रतिनिधी) – गोरगरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणाऱ्या मातीच्या रांजण व माठांना आता नागरिकांची मागणी वाढली आहे. उन्हाची चाहूल लागताच मातीचे माठ बाजारपेठेत दाखल झाले आहे.
यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने उन्हाची तीव्रता जास्त आहे. या माठांमध्ये रंगेबिरंगी असणारे मातीचे माठ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने या मातीच्या माठांना नागरिकांची पसंती मिळत आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना लिंबू शरबत गाडी, ज्यूस गाडी, घरगुती अशी ग्राहकांची मागणी आहे. सध्या बाजारात नवनवीन मातीचे माठ दाखल झाले असून, यावर तोटीसह नक्षीही करण्यात आली आहे. बाजारात आता १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत माठ बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत असल्याने माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कमी किमतीमध्ये फ्रीजप्रमाणे उन्हाळ्यात नैसर्गिक पाण्याची तहान भागवली जाते, या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळे महत्त्व आहे. माठामध्ये देखील बदल करून त्यास तोटी, झाकण हे वेगळे बनवून ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. रांजण व रांजणीला ५०० ते १०००पर्यंत भाव आलेला आहे.
यंदा सर्वात कमी किमतीत हा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. माठातील पाण्याची चवच न्यारी असते. तालुक्यातील विविध गावांतील आठवडे बाजारात मातीचे माठ घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. शहरातील विविध भागात सामाजिक संघटनांतर्फे पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने यंदाचा उन्हाळा नागरिकांना चांगलाच चटका लावणार असल्याचे दिसत आहे.
१. कोणता माठ किती रुपयांना?
काळे माठ दीडशे रुपयांपासून पुढे
काळ्या माठातील पाणी थंड व गोड असते, असा समज आहे. या माठाला बरीच मागणी असते. सध्या या माठाची किंमत १५० रुपयांपासून पुढे आहे.
२. लाल माठाची किंमत १६० रुपये
धार्मिक कार्य व सणासुदीच्या काळात लाल माठाला मागणी असते. सध्या या माठाची किंमत १६० ते २०० रुपयांपासून पुढे आहे.
३. चिनी मातीचे माठ सर्वाधिक महाग
आकर्षक रंगाचे चिनी मातीचे माठ विक्रीला येत आहेत. या माठाची क्रेझ आहे, त्यामुळे या पाठाची किमत २५० रुपयांपासून पुढे आहेत.