संकलित गणेश मूर्तींचे विधीवत पूजन व आरती करुन मनपा आयुक्तांच्या हस्ते विसर्जन
वाकड – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास, विसर्जन घाटावर जाऊन विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली होती. यामुळे अनेक नागरिकांनी शाडूच्या मूर्तींना प्राधान्य दिले आणि घरातच तसेच गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात मूर्तींचे विसर्जन केले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1315200952152940/
यंदा सर्वसामान्य नागरिकांना विसर्जन घाटांवर जाऊन विसर्जन करण्यास प्रतिबंध असल्याने महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नागरिकांकडून मूर्ती संकलित केल्या. या मूर्तींचे विधीवत पूजन व आरती करुन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते वाकड येथील घाटावर विसर्जन करण्यात आले. खोल पाण्यात मूर्तींचे विसर्जन व्हावे, यासाठी पालिका आणि संस्कार प्रतिष्ठानकडून यांत्रिकी पद्धतीचा वापर करण्यात आला.
स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनंतचतुदर्शीला सायंकाळी पाच वाजेपर्यंत 55 हजारांहून अधिक गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 25 हजार मूर्ती गेल्या दहा दिवसांमध्ये संकलित करण्यात आल्या तर अनंतचतुदर्शीच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 30 हजार मूर्ती संकलित करण्यात आल्या.या मूर्तींचे संस्कार प्रतिष्ठान आणि महापालिकेच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले.