पुणे – ससून रुग्णालयाच्या आवारात एखादा रुग्ण कोणत्याही कारणाने बेशुद्ध अवस्थेत पडला किंवा त्याला हृदयविकाराचा झटका (हार्टअटॅक) आल्यास त्याला तातडीची वैद्यकीय सेवा घटनास्थळी मिळणार आहे. यासाठी “कोड ब्ल्यू टीम’ची स्थापना करण्यात आली. या कोड ब्ल्यूचे उद्घाटन ससून सर्वोपचार रुग्णालयीचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोड ब्ल्यू टीममध्ये सहा परिचारिका, तीन इंटेन्सिव्हिस्ट आणि तीन डॉक्टर यांचा समावेश आहे. तीनही शिफ्टमध्ये ही टीम कार्यरत राहणार आहे.समन्वयक डॉ. किरणकुमार जाधव, डॉ. सुजित क्षीरसागर, डॉ. धनंजय उगले, डॉ. राहुल पंडित, गौरव महापुरे, मंगल मेढे यांनी कोड ब्ल्यूचे प्रोटोकॉल अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना हस्तांतरित केले. यावेळी डॉ. नरेश झंझाड, डॉ. आरती किणीकर, डॉ. यल्लापा जाधव, डॉ. सुनील भामरे, सर्व विभागप्रमुख, अधिसेविका विमल केदार, अधिसेविका रत्नमाला सोनवलकर, प्राचार्या कल्पना कांबळे, निवृत्ती जोरी उपस्थित होते.
औषध विभागप्रमुख डॉ. राजेश्वरी वोहरा यांनी कोड ब्ल्यू सिस्टीम खासगी रुग्णालयामध्ये कसे काम करते या बद्दल महिती दिली. तसेच औषध वैदक शास्त्र विभागप्रमुख डॉ. रोहिदास बोरसे यांनी कोड ब्ल्यू सिस्टर ससून रुग्णालयात कसे काम करणार याविषयी महिती दिली.