मुंबई – हाँगकाँगचा प्रसिद्ध पॉप गायक आणि गीतकार कोको लीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कोको ली आता या जगात नाही. असे मानले जाते की अमेरिकन गायका कोको लीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि ती कोमात गेली. दरम्यान, कोको लीची बहीण कॅरोल आणि नॅन्सी ली यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 48 वर्षीय कोको ली बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, असे समजते. सिंगरच्या बहिणींच्या म्हणण्यानुसार, कोको लीने गेल्या रविवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोको लीला रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाच्या टीमने कोको लीला कोमातून वाचवण्यासाठी आणि उपचार करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, परंतु सर्व प्रयत्न करूनही 5 जुलै 2023 रोजी त्याचा मृत्यू झाला.