Stock Market: भारतीय शेअर बाजार सोमवारी सलग पाचव्या व्यापार सत्रात तेजीसह बंद झाला. वित्तीय आणि ऊर्जा समभागांच्या वाढीमुळे NSE च्या निफ्टी-50 निर्देशांकाने इंट्रा-डे ट्रेड दरम्यान विक्रमी उच्चांक गाठला.
बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स आज 281.52 अंकांनी किंवा 0.39 टक्क्यांनी वाढून 72,708.16 वर बंद झाला. इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान, सेन्सेक्स 72,881.93 च्या उच्च आणि 72,308.68 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी-50 देखील 81.55 अंकांनी किंवा 0.37 टक्क्यांनी वर चढला आणि पुन्हा एकदा 22 हजारांची पातळी ओलांडून 22,122.25 अंकांवर बंद झाला.
सर्वाधिक वाढ झालेले शेअर्स ( Top Gainers ) –
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्हचे शेअर्स सर्वाधिक 2.86 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तसेच आयसीआयसीआय बँक 2.03 टक्के, भारती एअरटेल 2 टक्के, बजाज फायनान्स 1.41 टक्के, सन फार्मा 1.28 टक्के, आयटीसी, टायटन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले.
सर्वाधिक घट झालेले शेअर्स ( Top Losers ) –
दुसरीकडे, L&T चे समभाग सर्वात मोठ्या 1.45 टक्के घसरणीसह बंद झाले. याशिवाय विप्रो 1.45 टक्के, टीसीएस 0.67 टक्के, टाटा मोटर्स 0.66 टक्के यांसह ॲक्सिस बँक, एशियन पेंट्ससह 13 कंपन्यांचे शेअर्स घसरले.
निफ्टी-50 ने विक्रम मोडला –
भारतातील टॉप 50 कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निफ्टी-50 ने आज सलग पाचव्या ट्रेडिंग सत्रात तेजीचा कल कायम ठेवला आणि 22,157.90 अंकांच्या नवीन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला.
आज NSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप (Mcap) $ 4.65 ट्रिलियनच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी-50 ने सुमारे 2 टक्के वाढ नोंदवली आहे.
जागतिक बाजारपेठांची स्थिती काय आहे?
आशियाई बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे युरोपीय शेअर बाजार घसरले. त्याच वेळी, चंद्र नववर्षाच्या ( Lunar New Year) दीर्घ सुट्टीनंतर सोमवारी चीनचा शेअर बाजार पुन्हा उघडला. राष्ट्रपती दिनानिमित्त सोमवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
शुक्रवारचा बाजार कसा होता?
बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स शुक्रवारी 376.26 अंकांनी किंवा 0.52 टक्क्यांनी वाढून 72426.64 वर बंद झाला. इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान, सेन्सेक्स 72,545.33 वर उच्च आणि 72,218.10 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी-50 देखील 129.95 अंकांनी किंवा 0.59 टक्क्यांनी वाढून पुन्हा एकदा 22 हजारांची पातळी ओलांडून 22,040.70 अंकांवर बंद झाला होता.