पुणे – सहाव्या सिटी प्रीमियर लीग (सीपीएल 2024) 7-A- साईड फुटबॉल स्पर्धेेत साखळी फेरीत आर्यन शेडगेने केलेल्या दोनवेळा केलेल्या हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर डीसी ड्रॅगन्स संघाने १५ वर्षाखालील गटात सुरेख कामगिरी करत आपली विजयी मालिका कायम ठेवली.
स्पोर्टस फाऊंडेशन पुणे यांच्या मालकीच्या सिटी एफसी पुणे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत १५ वर्षाखालील गटात पहिल्या सामन्यात आर्यन शेडगे(९,१२,१७,२२मि.) याने नोंदवलेल्या चार गोलाच्या जोरावर डीसी ड्रॅगन्स संघाने प्रबल पँथर्स संघाचा ४-० असा एकतर्फी पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात डीसी ड्रॅगन्स संघाने सक्सेस स्ट्रायकर्सचा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून आर्यन शेडगे(१२, १९, २०मि.)ने तीन गोल केले.