Australian Open 2024 : रायबाकिनाचा धक्कादायक पराभव, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…

Australian Open 2024 : बिगरमानांकित रशियन अॅना ब्लिंकोव्हाने ग्रँड स्लॅम इतिहासातील एकेरी लढतीत जागतिक क्रमवारीत तिस-या क्रमांकावर असलेल्या रायबाकीनाचा सर्वात लांब टायब्रेकरमध्ये पराभव करून तिचे आव्हान संपुष्टात आणले. जागतिक क्रमवारीत 57व्या स्थानावर असलेल्या ब्लिंकोवाने गुरुवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्याचा पहिला सेट 6-4 असा जिंकला, तर गतवर्षीच्या अंतिम फेरीतील रायबाकिना हिने दुसरा सेट त्याच गुणांनी जिंकला.
तिसरा सेट 6-6 असा बरोबरीत सुटला आणि सामना टायब्रेकमध्ये गेला, जो ब्लिन्कोव्हाने 22-20 ने जिंकला. हा टायब्रेकर 31 मिनिटांपेक्षा जास्त काळ चालला.
ब्लिंकोव्हा शिवाय अन्य लढतीत महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्विटेकने संघर्षानतंर विजय प्राप्त केला. तिने अमेरिकेच्या कॉलिन्सचा 6-4, 3-6, 6-4 असा पराभव केला. त्याचवेळी पाचव्या मानांकित पेगुलाला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. तिला बिगरमानांकित बुरेलने 6-4, 6-2 ने पराभूत केले.
Australian Open 2024 : सुमित नागलचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत चिनी खेळाडूकडून पराभव…
त्याचवेळी ब्रिटनच्या एमिला रदुकानू हिलाही पराभवाला सामोरे जावे लागले. तिला चीनच्या वायएफ वांगने 6-4, 4-6, 6-4 असे पराभूत केले. अन्य लढतीत 19वी मानांकित स्वितोलिना आणि 11वी मानांकित ओस्टापेन्को यांनी विजयाची नोंद केली आणि तिसरी फेरी गाठली.

