डोर्लेवाडी – बारामती शहरासह ग्रामीण भागात आता करोनाचा प्रभाव कमी झाला आहे. तरी आता नव्या ओमायक्रॉनचा विषाणू डोके वर काढताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील
ढवळेवाडी, झारगडवाडी परिसरातील नागरिकांनी कोविडशिल्ड, कोव्हक्सीन ही घेण्यासाठी डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी करीत आहेत. आरोग्य प्रशासनाच्या वतीने देखील काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डोर्लेवाडी, झारगडवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ज्यांनी लस घेतलेली नाही. त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. लस घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढून करोनाला रोखू शकते. यात लस घेऊनही करोना झालाच तरी धोका कमी आहे, हे पटवून सांगितले जात आहे.
त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमात नागरिक लस घेत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी नियम पाळवेत, असे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.