चीन-पाकिस्तान आर्थिक कोरिडोर पूर्ण केल जाईल – इम्रान खान

 

इस्लामाबाद – महत्त्वाकांक्षी चीन-पाकिस्तान आर्थिक कोरिडोर कोणत्याही किंमतीत पूर्ण केला जाईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. 60 अब्ज डॉलरचा हा प्रकल्प हा चीन आणि पाकिस्तान या दोन्ही मित्र देशांमधील दृढ मैत्रीसंबंध दर्शवणारा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पाकिस्तानच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी सर्वोत्तम असून या अवाढव्य प्रकल्पामुळे पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल होईल, अशी खात्री वाटते आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले अहे. “सीपीईसी’ प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.

“सीपीईसी’ प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या प्रगतीबाबत इम्रान खान यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. या प्रकल्पाची क्षमता आणि व्याप्ती वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. अलिकडेच चीनचे विदेश मंत्री वॅंग यी यांनी “सीपीईसी’संदर्भात पाक परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली होती. या प्रकल्पाच्या कामाला वेग देण्याबाबत त्यांनी आग्रह धरला होता. या प्रकल्पासाठी कार्यरत असलेल्या चिनी कंपन्या आणि कामगारांना पाकिस्तानकडून संरक्षण पुरवले जाण्याची अपेक्षाही त्यांनी केली होती. या प्रकल्पाचे बहुतेक काम बेल्ट रोड इनिशिएटिव्ह या चिनी कंपनीद्वारे केले जात असून करोनाच्या प्रादुर्भावामुळे य कामावर विपरीत परिणाम झाला आहे. “सीपीईसी’ पाक व्याप्त काश्‍मीरमधून होत असल्याने भारताने या प्रकल्पाला विरोध केला आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.