पुणे – काश्मीरमधील लाल चौकातल्या पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या 24 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो. लालचौकातल्या या गणपतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले आणि काश्मीरमधील नागरिकांनी जपलेल्या या परंपरेचे कौतुक तर केलेच शिवाय संवेदनशील परिस्थितीत गणेशोत्सवानिमित्त अधोरेखित होणाऱ्या काश्मीरच्या सामाजिक आणि धार्मिक एकोप्याने आणि एकोप्याने ते भारावूनही गेले.
पुण्यातील “सरहद्द’ संस्थेच्या पुढाकाराने हा योग जुळवून आणला गेला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, वैभव वाघ, सचिन जामगे आदी उपस्थित होते. काश्मीरच्या लाल चौकात गणेशोत्सव साजरा होणे ही महाराष्ट्राला अभिमान वाटावी, अशी घटना आहे.
पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या या गणेशोत्सवाने मी भारावून गेलो आहे. हा एकोपा, सलोखा आणि शांती काश्मीरसह संपूर्ण भारतात अखंड टिकून राहावी, हाच आशीर्वाद मी गणपतीबाप्पाकडे मागितल्याचे शिंदे म्हणाले.