सातारा – “छत्रपती शिवाजी महाराज की जय’, “जय शिवाजी जय भवानी’च्या जयघोषात किल्ले प्रतापगडावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या नेटक्या नियोजनामुळे सर्व विधी उत्साही वातावरण पार पडले. जिल्हा परिषदेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतापगडावरील ध्वज बुरुज येथे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण करण्यात आले.
प्रतापगड (ता. महाबळेश्वर) शिवजयंती निमित्त जिल्हा परिषदेने विविध उपक्रमांचे केले होते. शिवज्योत नेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त किल्ले प्रतापगडावर शनिवारी रात्रीपासूनच दाखल झाले होते. शिवजयंती दिनी किल्ले प्रतापगडावरील भवानी मातेस अभिषेक आणि पूजा करण्याचा मान जिल्हा परिषद अध्यक्षांना असतो. मात्र प्रशासकीय राजवट असल्याने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या सुचनेप्रमाणे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत व सौ. सोनाली सावंत यांना भवानी मातेच्या अभिषेक व महापूजेचा मान देण्यात आला.
यावेळी याप्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, शिवनेरी हे जगाचे श्रद्धास्थान आहे. शक्ती आणि युक्ती या दोन शस्त्रासह रणनीती छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती त्यामुळेच बाराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. रयतेच्या कल्याणासाठी व हितासाठी तडजोड केली नाही, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकार कारभार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.