“चांद्रयान-2′ आज घेणार भरारी

20 तासांच्या काऊंटडाऊनला सुरुवात

चेन्नई – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-2 मोहिमेच्या प्रक्षेपणाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. रविवारी संध्याकाळपासून याच्या काऊंटडाऊनला सुरुवात होणार आहे, त्यानंतर नव्या वेळेप्रमाणे सोमवारी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी “चांद्रयान-2′ भरारी घेणार आहे.

इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन म्हणाले, 15 जुलै रोजी चांद्रयान-2च्या प्रक्षेपणात आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. गेल्या शनिवारी इस्रोने “चांद्रयान-2’च्या प्रक्षेपणासाठीचे यान जीएसएलव्ही मार्क 3 एम1 ची तालीमही पूर्ण केली आहे. यावेळी त्याच्या कामगिरीत कुठलीच अडचण आढळून आली नाही. त्यामुळे आता सोमवारी दुपारी 2.43 वाजता “चांद्रयान-2’चे प्रक्षेपण होणार आहे.

“चांद्रयान-2’चे 20 तासांचे काऊंटडाऊन रविवारी सायंकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी सुरू होणार असून उद्या दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यानाचे प्रेक्षपण करण्यात येणार आहे. याबाबतची सर्व तयारी करण्यात आली आहे. हे यान चंद्राच्या दिशेने सावकाशपणे झेप घेणार असून ते दक्षिण धुव्रावर उतरविण्यात येणार आहे, अशी माहिती सिवन यांनी दिली.

दरम्यान, “चांद्रयान-2’च्या प्रक्षेपणाची तारीख 15 जुलै रोजी निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, आयत्या वेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शेवटच्या क्षणी या यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)