इस्रोकडून अक्षय कुमारच्या “मिशन मंगल’ची स्तुती

बॉलीवूडमधील ऍक्‍शन हिरो म्हणून ओळखल्या जाणारा अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी “मिशन मंगल’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाल्या आहेत. मात्र, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशनने (इस्रो) याची प्रशंसा केली आहे.

या चित्रपटात ज्या मिशनसंबंधी इमोशंस आणि पैशन दाखविण्यात आले आहे, त्याची इस्रोकडून स्तुती करण्यात आली आहे. याबाबत इस्रोकडून अधिकृत ट्‌वीट करत लिहिले की, “मिशन मंगल’च्या ट्रेलरमधील इमोशंस आणि पैशन खूपच रोमांचक पद्धतीने मांडण्यात आले असून त्यांच्यासोबत इस्रोची टीम काम करीत आहे.

याबाबत अभिनेता अक्षय कुमार याने इस्रोचे आभार मानले आहे. अक्‍कीने लिहिले की, मिशन पूर्ण झाले. या कथेला प्रेरणादायी असा उल्लेख केल्याने सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशी संधी मिळणे ही सन्मानाची बाब असून “मिशन मंगल’च्या टीमकडून आभार मानतो.

दरम्यान, जगन शक्‍ती यांच्या दिग्दर्शित “मिशन मंगल’ हा चित्रपट 2013मध्ये इस्रोने राबविलेल्या मंगलयान प्रॉजेक्‍टवर आधारित आहे. यात अक्षयसोबत सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, कीर्ति, नित्या मेनन आणि शरमन जोशी झळकणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)