अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री किर्ती कुल्हारीने आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा केला.
किर्तीने आजवर “पिंक’, “उरी- द सर्जीकल स्ट्राईक’, “इंदू सरकार’ अशा अनेक हीट चित्रपटांत काम केले आहे.
किर्तीने थिएटर आर्टीस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर किर्तीने अनेक टीव्ही जाहीरांतीत काम केले आहे. जाहीरातीतींल ती एक ओळखीचा चेहरा आहे.
खिचडी या चित्रपटातून 2010मध्ये तिने फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. “मिशन मंगल’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचीही सर्वत्र चर्चा झाली होती.
तसेच “पिंक’मध्ये अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू या दिग्गज कलाकारांसह निर्णायक भूमिका साकारत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. यानंतर ती अनेक हीट चित्रपटांत दिसली होती. तर काही वेबसीरिज मध्येही ती झळकली आहे.
“फोर मोर शॉट्स प्लिज’, ःबार्ड ऑफ ब्लड’, “क्रिमिनल जस्टीस’ या वेबमालिकांत ती दिसली आहे. नुकतीच ती नेटफ्लिक्सच्या “द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटात झळकली होती.