आळंदी – “माझा प्रभाग, सुरक्षित प्रभाग’ चा नारा देत प्रभाग क्र. 7 मधील तापकीरनगर व इंद्रायणीनगर भागातील विविध ठिकाणी आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष सचिन रामदास गिलबिले यांच्या स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्याचे लोकार्पण दिघी वडमुखवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
महिला व विद्यार्थीनींची होणारी छेडछाड, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, हाणामारी, खून यासारखे गुन्हे घडल्यास तातडीने गुन्हेगारांना पकडण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची मदत पोलिसांना होत असते. गुन्हेगारांवर वचक ठेवून पोलिसांच्या मदतीकरिता व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरे प्रभागातील विविध 15 ठिकाणी बसवण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक सचिन रामदास गिलबिले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी सचिव के. के. निकम, भाजप जिल्हा सरचिटणीस भागवत आवटे, दत्तात्रय काटे, दत्तात्रय जोशी, कृष्णा काटे, सोमनाथ माळी, प्रवीण सुतार, गायकवाड महाराज, संतोष वायाळ, गिरीश काटे, दिनकर बडवणे, निखील पाटील, सागर साठे, राम काळे, चंद्रकांत अंबोरे, धनंजय मुंडे, विशाल भिसे, अभी पवार, जयमंगल मुळे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.