ठाणे – महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या दोन जणांना लाच घेतल्याच्या कारणावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. त्यात वीज वितरण कंपनीच्या एका कनिष्ठ अभियंत्याचाही समावेश आहे.
बसवराज बबनागरे असे या अभियंत्याचे नावू असून त्याने वीज मिटर बसवण्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराकडून पाच हजार रूपयांची लाच मागितली होती.
त्याने लाचलूचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी सापळा रचला त्यात हे दोन कर्मचारी रंगेहाथ पकडले गेले. हा प्रकार कल्याण शहरात घडला.
अभियंत्याबरोबर तेथे प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. या कार्यालयात कंत्राटदारांना पैशासाठी सतत छळले जात असल्याच्या तक्रारी होत्या.