पुणे – बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह शहरात पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणांतच पावसाने रौद्र रूप धारण केले. या पावसाने शहरासह उपनगरांत मोठे नुकसान केले. काही ठिकाणी लोक पाण्यात वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या.
तसेच पाण्याच्या प्रवाहात शहरातील अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी झाले होते. गॅस सिलिंडर, भांडी-कुंडी, टीव्ही, पलंग, घरगुती साहित्य, कपडे असं सगळंच या पाण्यात वाहून गेलं आणि होत्याचं न्हवतं झालं. मात्र, पाऊस थांबल्यानंतर 10 तासानंतरही शहराच्या विविध भागांमधील परिस्थिती गंभीर होती.