मुंबई – अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या सिनेसृष्टीपासून लांब असली तरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्रीती झिंटा सध्या आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. त्यामुळेच ती लाइफलाईटपासून दूर राहते. नुकतंच प्रितीने आपल्या इंस्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने फॅन्सद्वारे सेलिब्रेटींना होणाऱ्या अडचणींबाबत खंत व्यक्त केली आहे.
यावेळी प्रीती झिंटाने दोन व्हिडीओ पोस्ट करत तिच्यासोबत झालेल्या गैर वर्तणुकीबाबत सांगितले आहे. प्रितीने पोस्टद्वारे सांगितले की एका व्यक्तीने तिच्या मुलीजवळ अचानकपणे येऊन चुंबन घेण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या एका इन्सिडेंटमध्ये एक विकलांग व्यक्तीने तिच्या गाडीचा पाठलाग केला. या दोन्हही वेळेसचे व्हिडीओ प्रीती झिंटाने पोस्ट केले आहेत.
प्रितीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती घाईघाईत विमानतळावर जाण्यासाठी निघालेली दिसत आहे. यावेळी ती मीडिया फोटोग्राफर्सना देखील फ्लाईट पकडायची असल्याचे सांगते. मात्र इतक्यात एक विकलांग व्यक्ती आपल्या व्हील चेअरवर बसून प्रीती झिंटाकडे पैसे मागण्यासाठी येतो मात्र तिची गाडी तेथून निघते इतक्यात ती व्यक्ती कोणताही विचार न करता प्रीती झिंटाच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत असलयाचे दिसून येते.
View this post on Instagram
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या धक्कादायक इन्सिडेंटमुळे फक्त फॅन्सलाच नाही तर अनेक सेलिब्रेटीना देखील शॉक बसला आहे. अभिनेता हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी अभिनेत्रीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया देताना, हृतिक रोशनने हार्ट इमोजी शेअर केला आणि कमेंटमध्ये लिहिले, “वेल डन प्री.” अर्जुन रामपालने लिहिले की, “पुढच्या वेळी तुम्ही मला कॉल करा” त्याच वेळी प्रियंका चोप्राने थेट हात जोडल्याचा ईमोजी पोस्ट केला आहे.एवढेच नाही तर चाहत्यांनी देखील अभिनेत्रीची बाजू घेत कोणीही असा त्रास देऊ नये असं म्हंटल आहे.