Bollywood News । बिग बॉस 16 च्या विजेत्या एमसी स्टेनच्या फॅन फॉलोइंगची आतापर्यंत सर्वांना कल्पना आली आहे. रॅपर एमसीसाठी चाहत्यांचे वेड पाहण्यासारखे आहे. मात्र, खुद्द एमसी स्टॅनलाही त्याच्या चाहत्यांच्या संख्येची कल्पना नाही. बिग बॉस जिंकल्यानंतर, रॅपने घराघरात नाव बनले आहे.
चाहते नेहमीच त्याचे रॅप सॉंग सोशल मीडियावर ट्रेंड करत असतात. एमसी स्टेन हा सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या नव्या सॉन्गच्या माहिती ते लाईफचे अप अँड डाउन चाहत्यांसोबत पोस्ट करत शेअर करत असतो.
View this post on Instagram
अशात त्याने केलेल्या एका पोस्टमुले चाहते चिंतेत पडले आहे. या पोस्टमध्ये एमसी स्टॅन पोस्टमध्ये देवाकडे मृत्यूची मगणी करताना दिसत आहे. एमसी स्टॅन याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे, ‘अल्लाह बस मौत दे…’ सध्या एमसी स्टॅन याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
चाहते या पोस्टवर चिंता व्यक्त करत त्यांना नक्की काय झाले असा प्रश्न विचारत आहे तर काही चाहते हा नवा रॅप असणार असा अंदाज लावत आहे. चाहते एनसी स्टॅन याला नक्की काय झालं आहे? असं विचारताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘भाईला नक्की झालं तरी काय आहे?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘असं काहीही करू नको, तुझ्या चाहत्यांचा विचार कर…’ अशीही विनंती करत आहे.
दरम्यान इन्स्टाग्रामवर एमसी स्टॅन याने 10.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. एमसी स्टॅन त्याच्या महागड्या वस्तूंमुळे देखील चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन याच्या चेन आणि ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.