लोणी काळभोर- करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा पुरवठा कमी पडू नये यासाठी लोणी काळभोर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरांत 87 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. संत निरंकारी भवन येथे हे शिबिर पार पडले.
यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राहुल काळभोर, जिल्हा संघटक प्रमुख रमेश भोसले, शहर संघटक संतोष भोसले, वॉर्ड प्रमुख शिवाजी काळभोर, युवासेना शाखाप्रमुख अजय माने, प्रशांत पाटील, कृष्णा राऊत, राहूल महानवर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव उपस्थित होते. प्रादेशिक रक्तपेढी ससून यांनी सहकार्य केले. रक्तसंकलन डॉ. राजश्री चांडोळकर, डॉ. सुकृती ठाकूर, डॉ. सौरभ कुसरकर, डॉ. आशा कुबडे, ससून समाजसेवा अधीक्षक शरद देसले, अधिपरिचारीका मनीषा दिघे, तंत्रज्ञ सोनकांबळे यांनी केले.