सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण 

मुंबई : कोरोनाची बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यात आज नवे ४९ कोरोनाधित आढळून आले आहेत. त्यात एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे.

हे बाळ कल्याण डोंबवली मधील असून, एकूण तीन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज २४ वर पोहचली आहे.

आज आढळलेल्या रुग्णामध्ये एका ६० च्या आजीचा समावेश असून, एक रुग्ण ४१ वर्षांचा आहे. या सर्व रुग्णावर मुंबईच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत डोंबवलीत ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.