नातेपुते- शिंदेवाडी (ता. माळशिरस) येथे श्री लक्ष्मी आई यात्रा समाजसेवी न्यास तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 101 जणांनी रेवनील ब्लड बॅंक सांगोला यांच्याकडे रक्तदान केले. सध्या संपूर्ण जगाला करोना या महामारीने ग्रासले आहे. या जागतिक संकटातून बाहेर पडण्यासाठी देशामध्ये विविध स्तरांवर कोविड 19 जनजागृती अभियान राबविले जात आहे. करोनाच्या भीतीमुळे सध्या अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासत आहे.
मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून शिंदेवाडी येथील लक्ष्मीआई यात्रा न्यास कमिटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरामध्ये 101 रक्तदात्यांनी सामाजिक अंतर ठेवून रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना रेवनील ब्लड बॅंकेकडून प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिरासाठी श्रीलक्ष्मी आई यात्रा समाजसेवी न्यास सदस्य डी. जी. रणवरे, बाळासो शिंदे, राघू शिंदे, प्रदीप देशमुख, सुरेश शिंदे, साहिल अनपट, डॉ. नवाज शेख आदी ग्रामस्थांसह रक्तदाते उपस्थित होते.