पुणे शहरालगत असलेल्या उरुळीकांचन परिसराचे गेल्या 10 ते 12 वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झाले आहे. औद्योगिक, शैक्षणिक, नागरिकीकरणामुळे उरुळीकांचनचा कायापालट झाला आहे. आरोग्य क्षेत्रात दर्जेदार सुविधा देणारे हॉस्पिटल रुग्णसेवेत कार्यरत आहेत. यातील श्री गणराज हॉस्पिटल हे नाव हवेली तालुक्यात अग्रक्रमाने घेतले जाते. “डॉक्टर डे’निमित्त श्री गणराज हॉस्पिटलच्या सुविधा आणि उपचाराचा घेतलेला आढावा…
पुणे शहरात उच्चविद्याविभूषित होऊन पुणे शहरात स्थायिक होण्याची संधी असताना आपल्या मातीच्या ओढीने व आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या लोकांना झाला पाहिजे. या उद्देशाने डॉ. समीर ननावरे यांनी दहा वर्षांपूर्वी श्री “गणराज हॉस्पिटल’ अत्यंत जिद्द व चिकाटीने उभारले. डॉ. समीर ननावरे यांच्या घरी पारंपरिक व्यवसाय आहे. तसेच कौटुंबिक परिस्थिती बेताची असतानाही ते ज्ञानार्जनात कुठेही कमी पडले नाही, उलट परिस्थितीवर मात करत त्यांचे शिक्षण सुरूच ठेवले. डॉ. समीर यांचे 12वी पर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन येथे झाले.
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनही त्यांच्या हुशारीची चुणूक शालेय जीवनात दिसून आली होती. कॉलेज ऑफ आयुर्वेद ऍन्ड रिसर्च सेंटर येथून पदवीचे शिक्षण प्राप्त केले. पुण्यातील नामांकित अष्टांग कॉलेजमधून एमडी डिग्री प्राप्त केली. यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमधून प्रात्यक्षिकांचा अनुभव मिळविला. कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी, शैक्षणिक वारसा नसतानाही केवळ आपले कौशल्य, ज्ञान व माता-पित्यांचा आशीर्वाद यांच्यावर हॉस्पिटलने पंचक्रोशीत नामांकित हॉस्पिटलचा मान मिळवला.एवढेच नव्हे तर “जनतेशी नाळ जोडलेला डॉक्टर’ अशी उपाधी रुग्ण आनंदाने देतात.
समाज कार्यातही अग्रेसर
आपल्या रुग्णसेवेचे व्रत सुरू ठेवताना डॉक्टर समाजकार्यातही अग्रेसर असतात. उरुळीकांचन डॉक्टर्स असोसिएशनचे खजिनदार असून या असोसिएशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करीत आहेत. दरवर्षी होणारा पालखी सोहळ्यामध्ये ज्या दिवशी तुकाराम महाराजांची पालखी गावात येते. त्यादिवशी येणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मोफत औषधोपचार व अन्नदानाचा सोहळा केला जातो.
“औषधी बॅंक’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना डॉक्टरांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू केली आहे. “औषधी बॅंक’ म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यावर अनेक प्रकारची औषधे डॉक्टर लिहून देतात. बरे वाटल्यावर आपण सर्वच औषधे घेतोच, असे नाही. ती औषधे एकतर घरात पडून राहतात किंवा फेकून दिली जातात. मात्र, समाजात असे अनेक लोक आहेत, ज्यांना औषधोपचाराचा खर्च परवडत नाही. अशा रुग्णांची गरज लक्षात घेऊन “गणराज हॉस्पिटल’ने “औषध बॅंके’चा उपक्रम सुरू केला.
उपचारानंतर बरे वाटल्यावर आपल्याला जी औषधे नको आहेत, ती हॉस्पिटलमध्ये जमा करावीत. ती औषधे गोरगरीब, मोलमजूर, ऊसतोड कामगारांना तपासून मोफत दिली जातात. सर्व हॉस्पिटलने अनुकरणीय असा हा उपक्रम आहे. याचेच डॉक्टरांनी “मदतीचा हात’, असे नामकरण केले असून, यासाठी अनेक घटकांतून सहकार्य लाभत असते.
करोना महामारीत भरीव योगदान
सध्याच्या वैश्विक महामारीच्या, कोविडच्या साथीच्या काळात पहिल्या लाटेमध्ये रुग्णांना बेडची गरज पाहता डॉक्टरांनी तत्परतेने नवीन हॉस्पिटलची निर्मिती व विस्तारिकरण करून ग्रामीण भागातील रुग्णांना कोविडचे अद्ययावत उपचार अल्पदरात उपलब्ध करून दिले. यामध्ये 10 आयसीयू बेड व 25 ऑक्सिजन बेडचा समावेश होता.
“श्री गणराज हॉस्पिटल’मध्ये सुसज्ज व अद्ययावत ऑपरेशन थिएटर, सुसज्ज प्रसूतीविभाग, बालरोग विभाग, सर्व सुविधायुक्त आयसीयू, अपघात व ट्रॉमाविभाग, कार्डियाक ऍम्ब्युलन्स या सुुविधा उपलब्ध आहेत.
हॉस्पिटल चालवणे हे काही एकट्या दुकट्याचे काम नसून ते टीमवर्क आहे. यामध्ये सर्वात मोलाचे सहकार्य डॉ. मयुर पुस्तके (आयसीयू तज्ज्ञ) व डॉ. संदीप शिंदे सर यांचे आहे. हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ नर्स, मामा, मावश्या, वॉर्डबॉय, सिक्युरिटी, ऍडमिन, ऑफिस स्टाफ यांच्याशिवाय हे सर्व अशक्यप्राय होते. श्री गणराजाच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरी जावो, हीच डॉक्टरांची इच्छा असते.
“सर्वेपि सुखिना: सन्तु सर्वे सन्तुः निरामयः’
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि
या उक्तीप्रमाणे सदैव रुग्णसेवेसाठी तत्पर अव्याहत सेवा अथक कष्ट करण्याची वृत्ती तसेच रुग्णाबद्दल असणारी मनापासून तळमळ ही डॉक्टरची वैशिष्ट्ये. केवळ सतत स्वतःच्या खासगी प्रॅक्टिसमध्ये गुंतून न पडता वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य करण्याची डॉक्टरांची भूमिका असते.
डॉक्टर रुग्ण कल्याण समिती सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळीकांचन येथे कार्यरत आहेत. उरुळीकांचन आणि परिसरात खेड्यापाड्यावर उत्तम आरोग्य सुविधा कशा पुरवता येतील, यावर डॉक्टरांचा कटाक्ष असतो. यासाठी सतत वेळोवेळी आरोग्य शिबिरे व मार्गदर्शनपर व्याख्याने डॉक्टर देतात.
समाजामध्ये लोप पावत चाललेल्या “फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेचा पायंडा डॉक्टर रचत आहेत. कारण फॅमिली डॉक्टर हा केवळ पेशंट व डॉक्टर यांतील संबंधाचा व्यक्ती नसून तो त्या कुटुंबातील अत्यंत आदरणीय सदस्य असतो.
* शब्दांकन *
हनुमंत चिकणे
(उरुळीकांचन)