नवी दिल्ली – भाजप आणि संघाचे लोक हे खोटे हिंदु आहेत. ते केवळ स्वताच्या लाभासाठी हिंदुत्वाचा वापर करताता असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांचा या ‘हिंदूविरोधी’ वक्तव्याप्रकरणी भाजपा आमदाराकडून राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
भोपाळमधील भाजपाचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी वृत्त माध्यमांशी बोलतांना म्हंटले आहे की,’राहुल गांधीजी तुम्ही स्वत: हिंदू नसून तुमचे पूर्वजही हिंदू नव्हते. आम्हाला हिंदू असण्याची लाज वाटत नाही. नेहरु असतानाच देशाचं विभाजन झालं, हजारो हिंदू मारले गेले. देवाचे आभार माना की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला.” असं म्हणत शर्मा यांनी राहुल यांच्यावर जहरी टीका केली आहे.
धर्माचा व्यक्तीगत लाभासाठी वापर करायचा नाही अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. जी भाजप-संघाच्या लोकांच्या नेमकी विरूद्ध आहे. या दोनच प्रमुख विचारसरणी देशात आहेत त्यापैकी एक विचारसरणीच देशात राज्य करू शकते असेही त्यांनी नमूद केले. महालक्ष्मी ही शक्तीची देवता आहे. लोकांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी लक्ष्मी उपयोगी पडते. आणि दुर्गा ही लोकांना बळ देणारी आणि लोकांचे रक्षण करणारी देवता आहे. असा हल्लाबोल राहुल यांनी केला होता.