मुज्जफरपुर: भारतीय जनता पक्षाचे उत्तरप्रदेशातील विभागीय सरचिटणीस महेश चंद शर्मा यांच्यावर आपल्याच सुनेचा लैगिक छळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. सुनेनेच त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या मुलीची आता वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. तथापी शर्मा यांनी मात्र आपल्यावरील या आरोपाचा इन्कार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की आपला मुलगा आणि सून यांच्यात संपत्तीच्या कारणावरून वाद आहेत. या वादाचा बदला घेण्यासाठीच आपल्या विरोधात सुनेने ही खोटी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी विशेष दखल घेऊन चौकशीला सुरूवात केली आहे.