नवी दिल्ली: कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सैफुद्दीन सोज यांचा उल्लेख करताना भाजपवर कठोर आरोप केले.
लोकशाहीच्या प्रक्रियांना बळकट करण्यात सैफुद्दीन सोज यांची मोठी भूमिका होती. त्यांना कैदी समजून भाजप सरकार लोकशाहीला चिरडत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एक वर्षापासून हुकूमशाही अस्तित्वात आहे. भारत एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र असल्याचे मला सरकारला आठवण करून द्यायचे आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
दरम्यान, सैफुद्दीन सोझ यांनी सोमवारी दावा केला की ते अजूनही नजरकैदेत आहे. त्यांच्या घराचे गेटही आतून बंद झाले आहे. सरकारने 30 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मला सोडण्यात आले होते, असे सांगितले होते परंतु सरकारने न्यायालयात व बाहेर खोटी विधाने केले आहेत. मी त्याच दिवशी सरकार खोटं बोलत असल्याचे स्पष्ट केले. परंतु सरकार सतत विनाकारण खोटेपणा पसरवत आहे. त्याच्या घरी तैनात असलेल्या पोलिसांनी आता मुख्य गेटला आतून कुलूप लावले आहे, असे सोज यांनी सांगितले.
सोज यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि आपल्या पतीला बेकायदेशीर कोठडीतून सोडण्याचे आवाहन केले. यावर जम्मू-काश्मीर प्रशासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केले होते की, सोज यांना कधीही नजरकैद करण्यात आले नाही किंवा त्यांना नजरकैदेत ठेवले नाही. त्यांच्या हालचालीवर कोणतेही बंधन नाही.