BJP Candidate List| देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिलला होणार आहे. त्याअनुषंणाने उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. तर काही जागांबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. यातच आता भाजपने लोकसभा उमेदवारांची 11 वी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवाराणच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
भाजपच्या 11 व्या यादीत केवळ एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील भदोही लोकसभा मतदारसंघातून डॉ. विनोद कुमार बिंद यांना तिकीट दिले आहे. भाजपने आतापर्यंत उत्तर प्रदेशातील 71 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे अद्यापही रायबरेली, कैसरगंज, देवरिया आणि फिरोजाबाद लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा बाकी आहे.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने आगामी लोकसभा चुनाव-2024 के लिए 11वीं सूची में एक नाम पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/BWH9j7zi4q
— BJP LIVE (@BJPLive) April 11, 2024
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत महाराष्ट्राती सातारा आणि रत्नागिरी या लोकसभा मतदार संघांचा समावेश नाही. त्यामुळे अद्यापही या जागांचा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, भाजपकडून साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले आणि रत्नागिरीतून नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. परंतु याबाब अद्याप कोणतीह घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा:
छगन भुजबळ कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार? भूमिका केली स्पष्ट…