BJP 8th List For Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणूक 2024 चा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद निवडणुकीत लावली आहे. भारतीय जनता पक्षाने शनिवारी उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. यावेळी पार्टीने बॉलिवूड अभिनेता सनी देओलचे तिकीट रद्द केले.
BJP releases the 8th list of the Lok Sabha Candidates from Odisha, Punjab and West Bengal.
Dinesh Singh ‘Babbu’ to contest from Gurdaspur, Taranjit Singh Sandhu from Amritsar, Shushil Kumar Rinku from Jalandhar, Hans Raj Hans from Faridkot, Preneet Kaur from Patiala pic.twitter.com/3ohV44tAC5
— ANI (@ANI) March 30, 2024
भाजपने तीन राज्यांतील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने पंजाब, पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 11 उमेदवारांची नावे आहेत. ओडिशातील 3, पश्चिम बंगालमध्ये 2 आणि पंजाबमध्ये 6 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. पंजाबमधील गुरुदासपूरमधून विद्यमान खासदार सनी देओलच्या जागी दिनेश सिंग बब्बू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पहा
ओडिशा
जाजपुरा (SC): रवींद्र नारायण बेहरा
कंधमाल : सुकांतकुमार पाणिग्रही
कटक : भर्त्रीहरी महाताब
पंजाब
गुरुदासपूर : दिनेश सिंग ‘बब्बू’
अमृतसर: तरनजीत सिंग संधू
जालंधर: सुशील कुमार रिंकू
लुधियाना : रवनीत सिंग बिट्टू
फरीदकोट : हंसराज हंस
पटियाला: प्रनीत कौर
पश्चिम बंगाल
झारग्राम (ST) : प्रवत तुडू
बीरभूम : देबाशिष धर