मुंबई – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा हिट चित्रपट ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन-शिवा’ 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ‘ब्रह्मास्त्र’ दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटाचे एक वर्ष साजरे केले आणि सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली.
चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अयानने ‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाची घोषणा केली. उर्वरित दोन्हही चित्रपटाचे काम सुरू असल्याचे यावेळी आयानने आपल्या पोस्टमधून स्पष्ट केले आहे. यासोबतच अयानने ‘ब्रह्मास्त्र’च्या पुढील भागातील काही सुरुवातीच्या कलाकृती देखील शेअर केल्या आहेत.
अयानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ‘ब्रह्मास्त्र भाग 2’ आणि ‘ब्रह्मास्त्र भाग 3’ ची प्रारंभिक संकल्पना दर्शविली आहे.दुसऱ्या आणि तिसऱ्या पार्टचे आर्टवर्क यावेळी अयानने शेअर केले आहे. आर्टवर्क शेअर करताना अयानने लिहिले, “ब्रह्मास्त्र – भाग 2: देव. गेल्या काही महिन्यांपासून ब्रह्मास्त्र 2 आणि 3 च्या आर्टवर्क आणि कथेवर सतत काम करत आहेत.
View this post on Instagram
अयानने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चित्तथरारक आहे. त्यावरून दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात काहीतरी दमदार पाहायला मिळणार असल्याचे समजते. या व्हिडीओमुळे ब्रम्हास्त्रच्या आगामी पार्टबाबत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.