कार्ला, (वार्ताहर) – लोणावळ्याजवळील वरसोली ग्रुपग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या साठी मावळचे आमदार सुनील शेळके यांंच्या माध्यमातून ५० लक्ष निधी विविध विकास कामांसाठी मिळाला आहे. त्यातून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सरपंच संजय खांडेभरड व उपसरपंच नलिनी खांडेभरड यांंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी सदस्य अविनाश बालगुडे, नारायण कुटे, विजय महाडीक, राहुल सुतार, सदस्या रजनी कुटे, मंदा पाटेकर, मीना शिद, सीता ठोंबरे, ग्रामसेवक दीपक शिरसाट, माजी सरपंच सारिका संजय खाडेभरड, माजी उपसरपंच शाम येवले. केतन खांडेभरड, संतोष मराठे, विजय खांडेभरड, भरत बोडके, राजू कुटे, नामदेव पाटेकर, राजू खांडेभरड, दशरथ खांडेभरड आदी उपस्थित होते.