जडचेर्ला (तेलंगणा) – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येथून पुढे सुरू झाली. यावेळी राहुल गांधी यांनी यात्रेत सहभागी झालेल्या लहान मुलांबरोबर यात्रा मार्गावर चक्क वेगवान धावणे सुरू केल्याने उपस्थितांनी त्यांना जल्लोषात प्रतिसाद दिला. मात्र त्यांच्या या धावण्याने सुरक्षा यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.
यात्रेत सहभागी झालेल्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचीही यावेळी त्यांच्या सोबत धावताना चांगलीच दमछाक झाली. यात्रेचा तेलंगणातील आज पाचवा दिवस आहे. ही यात्रा संध्याकाळी शादनगर येथील सोलीपुर जंक्शन येथे पोहोचेल त्यावेळी तेथे राहुल गांधींच्या सभेचे आयोजन करण्यात आहे.
7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ही यात्रा तेलंगणातील 19 विधानसभा आणि 7 संसदीय मतदारसंघांचा कव्हर करेल, यात्रेचा तेलंगणातील एकूण मार्ग 375 किमीचा आहे. 4 नोव्हेंबर रोजी यात्रा एक दिवसासाठी थांबवण्यात येणार आहे.