मुंबई – दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘इंशाअल्लाह’ चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ या सुपरहिट चित्रपटानंतर भन्साळींनी ‘इंशाअल्लाह’ चित्रपटात सलमान खानसोबत काम करणार असल्याची घोषणा केल्याने चाहतेही खुश झाले होते. मात्र सलमान खान आणि भन्साळी यांच्यातील रचनात्मक मतभेदांमुळे हा प्रकल्प रखडला होता.
मागील काही वर्षांपासून हा चित्रपट रखडल्याने चाहतेही नाराज झाले आहेत. मात्र आता याप्रकरणावर भन्साळी प्रॉडक्शनच्या सीईओ प्रेरणा सिंग यांनी एक अपडेट शेअर केली आहे. प्रेरणाला इंशाअल्लाहचा रिमेक करण्याच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आले तेव्हा एका मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या की, “ही एक अतिशय चांगली कथा आहे आणि जर बोलवलं तर नक्कीच होईल. सद्यस्थितीत तातडीने कोणतीही योजना नाही. ती म्हणाली की, ‘कल्पना हीच आहे. ही सर्व त्यांची कल्पना आहे आणि ती तयार आहे. ते नैसर्गिकरित्या आले पाहिजे आणि आतून आले पाहिजे. आता मला ते बनवायचे आहे.”
दरम्यान, सलमान या चित्रपटात फ्लोरिडास्थित एका व्यावसायिकाची भूमिका साकारणार असल्याचे म्हंटले जात होते. सलमान “इंशाअल्लाह’मध्ये 40 वर्षांच्या व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसेन अशी माहिती मिळाली आहे. तर आलिया ही गंगेच्या काठी राहणाऱ्या एका विशीतल्या तरूणीची भूमिका साकारणार असल्याचे म्हंटले जात आहे.
सलमानच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, तो शेवटचा ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये दिसला होता. त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर 3’ दिवाळीमध्ये 2023 ला रिलीज होणार आहे.