नगर – पांगरमल दारूकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री गोविंद कोकाटे हिची जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
पांगरमल दारूकांड प्रकरणातील आरोपी भाग्यश्री मोकाटे गुन्हा घडल्यापासून, गेली सहा वर्षे फरार होती. न्यायालयाने तिला फरार घोषित केले होते. त्यानंतर राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी) पथकाने तिला रविवारी पुण्यात अटक केली. तिला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. तपासी अधिकारी सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक पवार यांनी न्यायालयीन कोठडीचा अहवाल सादर केला. त्यामुळे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भाग्यश्री मोकाटे हीची न्यायालयीन कोठठीत रवानगी केली.सरकारतर्फे सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले.
या गुन्ह्यात यापूर्वीच 20 आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर झालेले आहे. सहा वर्षांपूर्वीच्या या दारुकांडात 9 जणांचा मृत्यू झाला, दोघांना कायमचे अपंगत्व आले तर एकाला कायमचे अंधत्व आले. यासंदर्भात सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा तपास नंतर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.