प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 20 – महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित कै.जडावबाई नारायणदासजी दुगड माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक भागुजी शिखरे यांना महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संस्थेचा 95 व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेचे सचिव प्रसाद मारुतराव आबनावे यांचे हस्ते यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुमन घोलप, उपाध्यक्षा प्रेमलता आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव प्रकाश आबनावे, पुष्कर आबनावे, संचालक दिलीप आबनावे, राजेश आबनावे व संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी आदी उपस्थित होते. संस्थेतर्फे दरवर्षी एका शिक्षकास आदर्श शिक्षक पुरस्कार साठी निवड करण्यात येते. शिखरे हे गेली 24 वर्ष संस्थेत कलाशिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. ते वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण करीत असतात. शालेय पातळीवर घेतली जाणारी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत असतात. त्यामुळे गेली अनेक वर्षविद्यालयाचा शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमीजीएट ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागत आहे.