नवी दिल्ली – उत्तराखंडमधील सिल्कियारा बोगदा (Uttarakhand tunnel disaster) कोसळण्याच्या ठिकाणी अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याचे कसोशिचे प्रयत्न सुरू असून आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अरनॉल्ड डिक्स (Arnold Dix) हे घटनास्थळी दाखल झाले आहेत त्यांनी बोगद्याच्या ठिकाणी तपासणी केली.आत अडकलेल्या सर्वांची सुटका करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Uttarakhand news)
इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष, अरनॉल्ड डिक्स, उत्तरकाशीच्या (Uttarkashi) सिल्क्यरा येथे बचाव कार्यात मदत करण्यासाठी कार्यरत झाले आहेत. ते म्हणाले की मला या कामासाठी हिमालयातील भूगर्भशास्त्रातले सर्वोत्तम तज्ञ मिळाले आहेत,त्यांच्या मदतीने हे काम करण्यात मी पुर्ण यशस्वी होईल असा विश्वास प्रोफेसर डिक्स यांनी व्यक्त केला.ते म्हणाले की, मला बोगद्यात खाली काय चालले आहे ते पहायचे आहे, त्यासाठी मला तळाशी जाऊन पहावे लागेल, हे कोणत्याही जटिल कामासारखे आहे त्यासाठी आम्हीं प्रयत्नशील आहोत असे डिक्स यांनी सांगितले. अडकलेल्या कोणालाहीं दुखापत न होता वाचवण्याचा आमचा हेतू आहे असेही त्यांनी नमूद केले. (International tunnel expert)
डिक्स भूमिगत आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये माहिर आहेत.भूगर्भातील बोगद्याच्या कामांच्या संबंधात ते जगातील आघाडीचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. दरम्यान, सिल्क्यरा बोगदा कोसळण्याच्या ठिकाणी अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न नवव्या दिवशीही सुरू आहेत. या कामाच्या संबंधात उत्तराखंड सरकार आणि केंद्र एकमेकांच्या संपर्कात आहेत.
बोगद्यात अडकलेल्या मजूरांना वीज आणि पाणी उपलब्ध आहे आणि मजुरांना 4 इंची कॉम्प्रेसर पाइपलाइनद्वारे चना, मुरमुरे, ड्रायफ्रुट्स, औषधे इत्यादी पदार्थ पुरवले जाता आहेत. राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेड अन्नासाठी आणखी 6 इंची पाइपलाइन तयार करत आहे. यासाठी 60 मीटरपैकी खोदाई करावी लागणार असून त्यातील 39 मीटर पाईप खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे.