मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘सेक्शन ८४’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. याशिवाय, बिग बींचा दीपिका पदुकोणसोबतचा ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेकही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, अशातच स्वत:बद्दल केलेल्या एक विधानामुळे अमिताभ बच्चन चांगलेच चर्चेत आले आहेत.
बिग बींनी अलिकडेच एक ब्लॉग लिहिला आहे. आपल्या ब्लॉगमध्ये ते म्हणतात, “वय झाल्याने आता लोकांनी माझी खिल्ली उडवणे सोडले आहे. आता मला लोक म्हणतात, ८१ वर्षांचा म्हातारा झाला आहे. म्हातारा कमजोर झाला आहे. त्याला सहन करू शकतो. हे सगळे किती दिवस चालणार आणि कमेंट्स सुद्धा तशाच येत असतात… बिचारा, तो वेडा माणूस आहे, त्याला आता जाऊ द्या…,” असे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
मात्र, या ब्लॉगमध्ये बिग बी स्वत: स्वत:ची खिल्ली उडवताना दिसून येत आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान, बिग बी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. त्यांना बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर ब्लॉग लिहिताना त्यांनी हे विधान केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट चार मित्रांच्या मैत्रीवर आधारित होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उंचाई चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनुपम खेर देखील मुख्य भूमिकेत होते.