भार्गवी चिरमुलेचा ‘वन पीस व्हाईट’ मधला अंदाज इन्स्टावर हिट

भार्गवी चिरमुलेचे सुंदर आणि क्लासी फोटो, निसर्गरम्य ठिकाणी केलं फोटोशूट. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती अगदी निसर्गरम्य ठिकाणी बसलेली आहे.

मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेनं नुकतंच एक हटके फोटोशूट केलं आहे. अगदी क्लासी लूकमध्ये तिनं हे फोटोशूट केलं असून यात ती कमालीची सुंदर दिसतेय.

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती अगदी निसर्गरम्य ठिकाणी बसलेली आहे. तिने अनेक मराठी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलं आहे. भार्गवी ही आजच्या पिढीतील मराठी कलाकारांमध्ये कायम उल्लेखनीय आहे.

 

कास आणि वन रूम किचन यासारख्या चित्रपटात गंभीर भूमिका करण्यासोबतच तिनं फु बाई फू या कॉमेडी शोमध्ये मध्येही काम केलं आहे.

भार्गवीच्या चाहत्यांच्या हे फोटो प्रचंड पसंतीस उतरले आहेत. अनेकांनी हे फोटो शेअरसुद्धा केले आहेत. तिनं रूपारेल कॉलेजमधून पदवी घेत असताना नाटकांमध्ये काम करण्यास सुरवात केली. तिला पहिला ब्रेक मिळाला तो म्हणजे विश्व विनायक या चित्रपटत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.