बारामती -बारामती तालुक्यामध्ये करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार घेऊन यंत्रणा प्रभाविपणे राबवत करोनाची संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा, करोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
बारामती येथील करोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,
तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग पुणे धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद आरोग्य, बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेता सचिन सातव उपस्थित होते.
पवार म्हणाले, करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन सर्व विभागांनी प्रभाविपणे यंत्रणा राबवावी. लाटेमध्ये लहान बालके बाधित होण्याचा धोका संभवतो आहे,
तरी त्यांच्यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्यायबाबत कार्यवाही करावी. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी उपाययोजनांची माहिती दिली.