मंचर – जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने होत असल्याने गावच्या गावे प्रतिबंधात्मक क्षेत्रे घोषित केली जात आहेत. दरम्यान, मंचर (ता. आंबेगाव) आणि नारायणगाव (ता. जुन्नर) ही गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याने येथील खासगीसह सहकारी बॅंका, पतसंस्था पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरील आणि मोठी बाजारपेठ असलेली ही दोन्ही गावे आहेत. त्यामुळे या गावांमध्ये व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे या गावांमध्ये सहकारीसह मोठ्या खासगी बॅंकांच्या शाखा आहेत. त्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याने नागरिक व्यवहारांसाठी बॅंकांमध्ये येत आहेत.
मात्र, सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहात बॅंकामध्ये होणाऱ्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने गावांतील दुकांनांसह बॅंकाही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.