मुंबई – सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’चा बहुप्रतिक्षीत “पुष्पा द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रुपेरी पडल्यावर प्रदर्शित झाला आहे. करोना काळात सुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करत बक्कळ कमाई केली आहे. तर, ‘पुष्पा द राइज’च्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 68.19 कोटींची कमाई केली आहे.
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्नाची केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या चित्रपटातील सर्वच गाणी तुफान लोकप्रिय झाली असून,
यातील एक आयटम साँगमुळे प्रचंड चर्चेत आहे. आणि ते म्हणजे “उ अंतावा उ उ अंतावा..’ सध्या सर्वत्र या गाण्याची जादू दिसून येत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री ‘समांथा अक्कि’वर हे गाणं शूट करण्यात आलं आहे.
नुकतंच या आयटम साँगसाठी तिने कोट्यावधी रुपयांचे मानधन आकारल्याची चर्चा रंगली होती. यानंतर आता त्याचा खरा आकडा समोर आला आहे. “उ अंतावा उ उ अंतावा..’ या केवळ तीन मिनिटांच्या आयटम साँगसाठी समांथाने 1 किंवा 2 कोटी रुपये घेतल्याची माहिती समोर येत होती.
मात्र या गाण्यासाठी तिने तब्बल 5 कोटी रुपये मानधन आकरले आहे. समांथाने पहिल्यांदाच आयटम साँग केले आहे. या गाण्यात ती एकदम बोल्ड अंदाजात दिसत असून, तिच्या डान्सचे प्रचंड कौतुक केले जात आहे. “पुष्पा द राइज’ हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.