मुंबई – बॉलीवूडमधील अष्टपैलू ‘अभिनेता आयुष्मान खुराणा’ने आतापर्यंत ‘विकी डोनर’, ‘बधाई हो’ आणि ‘अंधाधुन’ सारख्या सिनेमांचा समावेश आहे. ‘विकी डोनर’ आणि ‘अंधाधुन’ हे सिनेमे तर स्वतः आयुष्मान खुरानाही इतके प्रिय आहेत की या सिनेमांच्या स्क्रीप्ट तो एखाद्या लॉकरमध्ये सांभाळून ठेवायला तयार आहे.
View this post on Instagram
मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर आज आयुष्यमान खुराणाने चित्रपटसृष्टीत आपलं मोठं स्थान निर्माण केलेलं आहे. नुकतंच आयुष्यान ने एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमधल्या भेदभावावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
आयुष्यमान म्हणाला, “मी स्टारकिड असतो, तर केव्हाच मला क्षेत्रात लाँच केलं गेलं असतं… आलिया भट्ट, वरुण धवन, रणबीर कपूर गुणवान आहेत. त्यांना फक्त स्टार किड्स असल्यामुळं चित्रपट मिळतात असं नाही. त्यांना लवकर संधी मिळते. आणि त्यामुळे करिअरचा अमूल्य वेळ वाया जात नाही” असं आयुष्यमान म्हणाला.