मुंबई – अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ओह माय गॉड 2 हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. याच अनुषंगाने चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरवरून चित्रपटात कथेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. पहिला ओएमजी सुपरहिट ठरल्यामुळे दुसऱ्या पार्टमधून देखील प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहे.
“ओह माय गॉड 2 चा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांची केमिस्ट्री अप्रतिम आहे.ट्रेलरच्या सुरुवातीला भगवान शंकर आपल्या एका भक्ताला संकटातून वाचवण्यासाठी एका दूताला पृथ्वीवर जाण्यासाठी सांगतात. यानंतर तो भक्त आणि त्याच्या अवतीभवती फिरणारी कथा चांगलीच रंजक असल्याचे ट्रेलरवरून तरी समजते.
‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटात अक्षय भगवान शिवाच्या (महादेव) भूमिकेत दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर बॅक टू बॅक फ्लॉप दिल्यानंतर, यावेळी अक्षय कुमारला भगवान शिवाच्या अवतारात पाहून त्याचे चाहते खूप खुश झाले आहेत.हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. गदर 2 देखील याच दिवशी प्रदर्शित होणार असल्यामुळे दोन्हही चित्रपटांमध्ये तगडी फाईट होणार असल्याच्या समजते.
2012 मध्ये आलेल्या OMG चित्रपटात नास्तिक कांजीलाल मेहता यांची कथा दाखवण्यात आली होती, मात्र या सिक्वेलमध्ये देवावर अतूट श्रद्धा असलेल्या पंकज त्रिपाठीची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी कांती शरण मुदगल यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.