ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया ‘अ’ महिला संघाने तिस-या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय ‘अ’ संघाचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह तीन अधिकृत सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलिया ‘अ’ महिला संघाने २-१ अशी जिंकली.
Aussies win! After a complete bowling performance restricted the visitors to 176, Erin Burns dug in with a crucial half century to steer Australia to a series-clinching victory over India A.
Scorecard: https://t.co/jLsOQwYHxX pic.twitter.com/RMDYHMIDH6
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) December 16, 2019
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद १७६ धावा केल्या होत्या. भारताकडून अरूंधती रेड्डीने सर्वाधिक ४५ तर वेदा कृष्णमूर्तीने ३५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या स्ट्रॅनोने २६ धावात ३ तर ताहलिया मॅकग्राने ३९ धावात २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने विजयासाठीचे १७७ धावांचे आव्हान ७ बाद ३९.३ षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत एरिन बर्न्सने नाबाद ५३ आणि जाॅर्जिया रेडिमेन हिने ४१ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
भारताकडून हेमलताने ३५ धावा देत ३ तर डीपी कन्वर हिने २९ धावा देत २ गडी बाद केले.एकदिवसीय मालिकेनंतर आता दोन्ही संघात १९ डिसेंबरपासून तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेस सुरूवात होणार आहे.