पिंपरी – पतीच्या मित्राने पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच विवाहिता, तिचा पती व मुलांना मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार केला. ही घटना बाणेर येथे घडली. याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बाळासाहेब सदाशिव मुरकूटे (वय 33, रा. बाणेर, पुणे) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जानेवारी 2016 ते मे 2019 या कालावधीत बाणेर येथे घडली. आरोपी मुरकूटे हा फिर्यादी विवाहिता यांच्या पतीचा मित्र आहे. त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादी, त्यांचा पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अश्लिल चित्रफित तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर याबाबत अधिक तपास करीत आहेत.