– विनिता शाह
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे महत्त्वाचे नेते नवाझ शरीङ्ग यांच्या कन्या मरियम शरीङ्ग यांनी अलीकडेच पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे त्या केवळ पंजाबच्याच नव्हे तर पाकिस्तानातील कोणत्याही प्रांताच्या मुख्यमंत्री होणार्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्याबरोबरच शरीङ्ग कुटुंबातील राजकारणाची सूत्रे आता पुढची पिढीकडे जात असल्याचेही हे चिन्ह असल्याचे मानले जात आहे. बेनझीर भुत्तो यांच्यानंतर पाकिस्तानी राजकारणावर प्रभाव टाकू शकतील अशा त्या दुसर्याच महिला ठरतात. 1999 मध्ये जनरल मुशर्रङ्ग यांनी नवाज शरीङ्ग यांना तुरुंगात टाकले होते तेव्हा मरियम नवाज या वडिलांच्या सुटकेसाठी आईसह रस्त्यावर उतरल्या होत्या.
पाकिस्तानात मुख्यमंत्री होणार्या मरियम नवाज या पहिल्या महिला आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या संसदेत निवडून आल्या. मरियम नवाज या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. गेल्या काही वर्षात कारभारात सैनिकांचा हस्तक्षेप वाढलेला असताना कसे का होईना निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जात असताना लोकशाहीचे वस्रहरण संपूर्ण जगाने पाहिले. नंतर राजकीय घराणेशाहीचे पिक आले. चाणाक्ष नेते नवाज शरीङ्ग यांनी सत्तेच्या सारीपाटात खेळलेले डाव खुर्ची मिळवण्यासाठीच होते, परंतु जनतेच्या मनात वेगळेच होते. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांची जादू चालली. निवडणुकीत प्रचंड गैरप्रकार होऊनही आणि नवाज शरीङ्ग यांची इच्छा असूनही ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. शेवटी ङ्गोडाङ्गोड करत सत्तेची कमान भावामार्ङ्गत मिळवण्याचा प्रयत्न केला.
शरीङ्ग यांचा राजकीय गड म्हणून ओळखल्या जाणार्या पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीङ्ग हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनल्याने तेथे राजकीय वर्चस्व राहण्यासाठी या प्रातांची धुरा मुलीकडे सोपविली. पाकिस्तानात तेहरिक ए इन्साङ्गचा प्रखर विरोध आणि बहिष्कार या वातावरणात मरियम नवाज यांना पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले. मरियम नवाज यांना राजकीय वारसा लाभला आहे.बर्याच काळापासून त्या वडिल आणि काकांच्या राजकीय मोहिमेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी राहिल्या. प्रारंभीच्या काळात राजकारणापासून दूर राहणार्या मरियम या मुशर्रङ्ग यांनी नवाज शरीङ्ग यांचा तख्तापलट केल्यानंतर चर्चेत आल्या. 1999 मध्ये जनरल मुशर्रङ्ग यांनी नवाज शरीङ्ग यांना तुरुंगात टाकले होते तेव्हा मरियम नवाज या वडिलांच्या सुटकेसाठी आईसह रस्त्यावर उतरल्या. त्यांनी जनरल मुशर्रङ्ग यांच्या हुकुमशाहीविरुद्ध जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला.
वास्तविक सैनिकी हुकुमशहाने शरीङ्ग कुटुंबातील सर्वच पुरुषांना डांबले किंवा नजरैकेद ठेवले होते. त्यानंतर कुटनितीच्या मार्गाने सौदी अरबला हाताशी धरले. सौदी अरबच्या मदतीने नवाज शरीङ्ग आणि त्यांच्या कुटुंबाला अभय मिळाले. एका करारानुसार शरीङ्ग आणि कुटुंबाला सौदीत राहण्याची परवानगी मिळाली. राजकीय तज्ज्ञांच्या मते, विजनवासाच्या काळात मरियम यांनी राजकीय डावपेचाचे धडे शिकले आणि स्वत:ला पाकिस्तानातील आव्हानात्मक स्थितीत तयार करण्याचा प्रयत्न केला. 2007 मध्ये शरीङ्ग कुटुंबाची घरवापसी झाली. वास्तविक मरियम यांची राजकीय सक्रियता ही काका शाहबाज यांच्या निवडणुक प्रचाराच्या मोहिमेतून वाढली.
महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेतला. एक महिला असल्याच्या नात्याने भावनेच्या पातळीवर त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. उच्चशिक्षित मरियम यांनी बदलत्या काळात सोशल मीडियाचे महत्त्व ओळखले आणि या क्षेत्रात पक्षाची मजबूत पकड केली. वास्तविक इम्रान खान यांचा पक्ष ‘पीटीआय’ची तरुणांत लोकप्रियता वाढत होती. परंतु त्यांचा मुकाबला करण्यासाठी मरियम यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यानंतर वडिलांनी स्थापन केलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) च्या सोशल मीडिया सेलला बळकटी देण्यासाठी सूत्रे हाती घेतली. मात्र त्या सक्रिय राजकारणात राहत नव्हत्या. यंदाच्या वादग्रस्त निवडणुकीत त्या पहिल्यांदा नॅशनल असेंब्लीसाठी निवडून आल्या.
नवाज शरीङ्ग यांची ज्येष्ठ कन्या मरियम यांनी बराच काळ दोन मुलांचा सांभाळ करण्यात व्यतीत केला. शरीङ्ग कुटुंब हे रुढीवादी मानले जाते. अशावेळी मुलगी राजकारणात येण्याची शक्यता कमीच होती. मात्र राजकीय स्थिती, नवाज शरीङ्ग आणि सैन्यातील संघर्ष पाहता मरियम यांना राजकारणात येण्यापासून पर्याय राहिला नाही. त्यांचा विवाह सैन्याधिकार्याशी झाला. त्याचे पती 1990 च्या काळात तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीङ्ग यांचे ‘एडीसी’ होते. अर्थात मरियम यांचे व्यक्तिमत्त्व पाकिस्तानच्या जनतेला प्रभावित करणारे राहिले आहे. त्यांचा समावेश पाकिस्तानातील काही वादग्रस्त नेत्यांतही होतो. त्या चांगल्या वक्त्या आहेत. कठीण काळात पक्ष बांधणीत योगदान दिल्याबद्दल पक्षाचे नेते मरियम यांची तारीङ्ग करतात. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून मरियम यांच्यावर घराणेशाहीवरून सातत्याने टीका केली जाते. शरीङ्ग कुटुंब हे भ्रष्टाचाराला पुरक आहे, असे विरोधक म्हणतात.
वडिलांना राजकीय आधार देण्याचा प्रयत्न करणार्या मरियम या पूर्वी राजकारणात सक्रिय नव्हत्या. पण नवाज शरीङ्ग हे तिसर्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा मरियम यांना देशाच्या युवा विकास कार्यक्रमाचे सर्वेसर्वा करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीवरून विरोधकांनी गदारोळ माजविला आणि हे प्रकरण न्यायालयात गेले. शेवटी त्यांना पद सोडावे लागले. तरीही त्यांनी रणनिती आखत सोशल मीडियावरुन पक्षाचे काम सुरू ठेवले. मात्र नवाज शरीङ्ग यांच्या तिसर्या कारकिर्दीत त्यांच्या हस्तक्षेपावरून बराच वाद झाला. त्या ‘सुपर पंतप्रधान’ म्हणून काम करतात, असाही आरोप केला गेला. त्यांना भ्रष्ट घराणेशाहीचे वाहक म्हणूनही संंबाधले गेले. कालातंराने पनामा पेपर्स लीक प्रकरणात त्यांचे नाव आले. यात परकी कंपन्यांशी त्यांचे आथिॅक सहकार्य उघडकीस आले. त्यांच्या परदेशातील मालमत्तेवरूनही चर्चा झाली.
अखेर सैनिकांच्या अभयाखाली वाढणारा विरोध आणि न्यायालयीन खटले पाहता नवाज शरीङ्ग यांना पदच्युत करण्यात आले. तेव्हा नवाज यांच्यासमवेत मरियमही तुरुंगात गेल्या. या तुरुंग प्रवासात त्यांची राजकीय उंची वाढली. त्याचवेळी इम्रान सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला. नवाज शरीङ्ग यांच्या गैरहजेरीत त्यांनी ‘पीएमएलएन’च्या कार्यकर्त्यांत ऐक्य निर्माण केले आणि 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील दुसर्या क्रमाकांचा पक्ष म्हणून नावारुपास आणले. सध्या मरियम नवाज या ‘पीएमएलएन’ मध्ये दुसर्या मोठ्या शक्तीशाली नेत्या म्हणून ओळखल्या जात आहेत.