Basketball : माजी राष्ट्रीय बास्केटबॉलपटू ‘रामराव शेडगे’ यांचे निधन

Pune – माजी राष्ट्रीय बास्केटबॉलपटू प्रशिक्षक व संघटक प्राध्यापक रामराव शेडगे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. निधन समयी ते ८९ वर्षांचे होते त्यांच्या मागे दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
प्राध्यापक शेडगे हे नौरोसजी वाडिया महाविद्यालयात रसायनशास्त्र विषय शिकवीत असत. शिस्तप्रिय परंतु लोकप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्याचबरोबर ते स्वतः उत्कृष्ट व्हॉलीबॉल व बास्केटबॉलपटू होते. त्यांनी आंतर महाविद्यालयीन, आंतर विभागीय व आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये स्वतःचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ठसा उमटविला होता.
बास्केटबॉल मध्ये त्यांनी अनेक वेळेला महाराष्ट्राकडून चमकदार कामगिरी केली होती. स्पर्धात्मक बास्केटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या खेळाच्या प्रसाराकरिता वाहून घेतले होते. पुणे जिल्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रात अन्य ठिकाणीही या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/most-sixes-in-test-rohit-sharma-equals-viv-richards/
पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटना तसेच पूना डायनामोज क्लब या संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. जिल्हा निवड समिती, राज्य निवड समिती पुणे विद्यापीठ निवड समिती इत्यादी समित्यांवरही त्यांनी काम केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे.





