– कल्याणी शंकर
अमेरिकी निवडणुकीबाबत भाकीत करणे खूप अवघड आहे. कारण बायडेन आणि ट्रम्प या दोघांत भरपूर वैशिष्ट्ये आणि उणिवाही आहेत.
2024 च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष बायडेन विरुद्ध माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असा मुकाबला होणार आहे. केवळ एक वर्षानंतर म्हणजे 5 नोव्हेंबर 2024 रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. “रॉयटर्स’च्या वृत्तानुसार आगामी निवडणूक ही अन्य अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे नसेल आणि या निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात. “न्यूयॉर्क टाइम्स’च्या मते, 2024 मध्ये होणारी निवडणूक ही 1860 नंतर प्रथमच रंजक होत असून तत्कालीन काळात अब्राहिम लिंकन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. एका अर्थाने बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवतीच निवडणूक घुटमळणार आहे.
2020ची अध्यक्षपदाची निवडणूक अनेक अर्थाने गाजली. निवडणुकीच्या काळात अमेरिकी राजधानीत कॅपिटॉल हिलवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला. एका अर्थाने अमेरिकी लोकशाही प्रणालीला गालबोट लागले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी हल्ला झाल्याचे अहवालात म्हटले आहे. “बीबीसी’च्या मते, 2024 ची निवडणूक ही 2020 चीच पुनरावृत्ती असेल आणि यात डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन हे एकमेकांविरुद्ध लढतील. मात्र प्रसंगी त्यांची भूमिका उलट राहू शकते. आजघडीला 9 रिपब्लिकन, 4 डेमोक्रॅट्स आणि 2 स्वतंत्र उमेदवार हे अध्यक्षपदाच्या मैदानात आहेत. पण सरतेशेवटी बायडेन आणि ट्रम्प हेच आपापल्या पक्षाचे उमेदवार राहतील. अर्थात 5 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर देशात आश्चर्यकारक वाटणाऱ्या संभाव्य उलथापालथीचा इन्कार करता येणार नाही.
उदाहरणार्थ, 1979 मध्ये एका ओलीस प्रकरणामुळे अध्यक्ष जिमी कार्टर यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागली. 2020च्या निवडणुकीत करोना लाटेने नकारात्मक भूमिका बजावली होती. आगामी काळात अनेक धक्कादायक गोष्टींचा अनुभव येऊ शकतो. एका प्रमुख उमेदवाराने पद सोडणे, इस्रायल गाझा युद्धाचे परिणाम आणि युक्रेनचा लांबलेला संघर्ष या गोष्टींचा समावेश करता येईल. राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. अर्थात सध्याच्या अध्यक्षास पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि तेच पुन्हा निवडून येत असतील तर यानिमित्ताने एक बाब जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ती म्हणजे जो देश तरुणांना प्राधान्य देतो त्यांना आपल्या दोन माजी अध्यक्षांपैकी एकाची निवड करण्याची वेळ येऊ शकते. अलीकडच्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प हे आपल्या प्रतिस्पर्ध्यांपासून बरेच अंतर पुढे गेले आहेत. अर्थात त्यांच्या पक्षाची दक्षिणपंथीय भागावर चांगली पकड आहे. रिपब्लिकनकडून अर्ज दाखल करत असतील तर त्यांना या निवडणुकीत उदारमतवाद आणि स्वतंत्र विचारांच्या मतदारांवर विजय मिळवणे कठिण जाऊ शकते आणि सामनाही करावा लागेल.
डेमोक्रॅटिक पक्षाचा विचार केल्यास बायडेन यांना तिघांचा सामना करावा लागू शकतो. त्यापैकी एक रॉबर्ट एफ केनेडी (ज्यूनिअर) यांचा समावेश आहे. ते स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. केनेडी यांची उमेदवारी ही कोणत्याही डेमोक्रॅटिक उमेदवारांची स्थिती आणि गणित खराब करू शकते. बहुतांश जणांसाठी ट्रम्प हे 2024 च्या अध्यक्षपद निवडणुकीतील आवडीचे उमेदवार आहेत. अर्थात बायडेन आणि ट्रम्प यांच्यात फरक काय आहे. बायडेन हे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि 2024 मध्ये ट्रम्प यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. ट्रम्प यांना रिपब्लिकनच्या रूपातून निवडून येता येऊ शकते. मात्र सहा महिन्यांपासून त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. ही गोष्ट बायडेन यांच्या पथ्यावर पडण्यासारखी आहे. सध्या महागाईत घट झाली आहे, रोजगारातील वाढ स्थिर आहे आणि शेअर बाजारात उसळी दिसून येते.
चीनबरोबर व्यापार करण्याबाबत इम्रिगेशनचे निर्बंध अधिक कडक करणे आणि मर्यादा लागू करणे, हे बायडेन यांना करावे लागेल. याशिवाय राजकीय अन्याय करणाऱ्या लोकांचा राजकीय बदला घेण्याची इच्छा देखील बायडेन बाळगून असतील. बायडेन यांनी अमेरिका आणि परदेशात अनेक दौरे केले असून तेथील कार्यक्रमात सहभागी होणे आणि निधी गोळा करण्याचे काम केले आहे. या आधारे ते निवडणूक मोहीम राबवित आहेत. बायडेन यांना पक्षातर्गंत आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. कारण केवळ 66 टक्के डेमोक्रॅट मंडळी त्यांच्या परदेशी धोरणाच्या मुद्द्यावरून पाठीशी आहेत, तर 74 टक्के अर्थव्यवस्था व्यवस्थापनाला पाठिंबा देत आहेत. तसेच 81 टक्के त्यास अनुमोदन देत आहेत. अर्थात तरुण कृष्णवर्णीय आणि लॅटिन अमेरिकी नागरिकांचे फारसे पाठबळ नसल्याने ही बाब बायडेन यांच्यासाठी चिंतास्पद राहू शकते.
अध्यक्ष बायडेन हे अमेरिकेची अर्थव्यवस्था सुस्थितीत ठेवणे आणि स्वाभिमानाची लढाई असे आवाहन करत ते प्रचार करत आहेत. बायडेन यांच्या मते, बेरोजगारी ही ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोचली आहे. जीडीपीही अपेक्षापेक्षा वेगाने वाढली आहे आणि कामगारांत वाढ झाली आहे. मात्र गेल्यावर्षी झालेली चलनवाढ आणि अन्नधान्य, इंधन, निवास आणि मोटार यासारख्या आवश्यक गोष्टींवरील खर्चात वाढ होणे, ही बाब बायडेन यांना अडचणीत आणणारी राहू शकते. एक वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी बायडेन यांची रणनीती ही 2020 चेच विषय पुन्हा उकरून काढण्याची आहे आणि ही बाब ट्रम्प यांच्यासाठी विरोधात्मक वातावरण तयार करणारी आहे.
बायडेन आणि ट्रम्प यांच्याकडे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, मात्र 44 टक्के अमेरिकी नागरिक म्हणतात, बायडेन यांच्या राजवटीत देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली. “सीएनबीसी’चे सर्वेक्षण पाहिले तर बायडेन यांचे अनुमोदन रेटिंग केवळ 37 टक्के आहे आणि त्याचवेळी ट्रम्प यांनी समोरासमोरच्या लढाईत बायडेन यांना चार गुणांनी पराभूत केले आहे. सध्याच्या काळात 48 टक्के अमेरिकी नागरिकांना ट्रम्प यांची कामगिरी मान्य आहे. अमेरिका इस्रायल-हमास आणि युक्रेन यांच्या संघर्षावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी चीन, रशिया आणि इराण हे नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्था तयार करण्याचे काम करत आहेत.