मुंबई – बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हीची अनेकदा चर्चा रंगते. नव्या इतर स्टारकिड्स पेक्षा वेगळी असल्याचे अनेकजण म्हणतात. अनेकदा तिच्या कामाचे कौतुक केले जाते. कमी वयात तिने स्वत: स्टार्टअप सुरु केले आहे. ज्या माध्यमातून ती महिला शिक्षण, महिला सबलीकरण यासाठी करते. नुकतेच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तिने सांगितलेल्या काही गोष्टी ऐकून अनेक जण थक्क झाले. विशेष म्हणजे यावेळी तिने हिंदीत बोलणे पसंत केले. ज्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
एका मुलाखतीदरम्यान नव्या म्हणाली की, “मी सतत तुझं वय कमी आहे, तुला अनुभव नाही ही गोष्ट ऐकत आले आहे. त्यामुळे अनेकदा असा प्रश्न उपस्थित केला जातो की वयाच्या २५ व्या वर्षी तू कसं काय वैद्यकीय किंवा कायदेविषयक समस्या, घरगुती हिंसा यांसारख्या समस्यांवर काम करू शकते? पण मी जर ८० वर्षापर्यंत हे सगळं करायचं थांबले तर जगाचं काय होईल? आपल्या देशातील लोकसंख्येपैकी २५ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. जर आपण सगळेच वयाच्या पन्नाशीपर्यंत काही करण्यासाठी वाट बघत बसलो तर या नवीन पिढीचं काय होईल? बदल कोण घडवेल? आपल्या देशाच्या नवीन पिढीला कमी वयात खूप ज्ञान आहे.”
यावेळी तिने सध्या अभिनयात करिअर करण्याची इच्छा नसल्याचेही सांगितले. तिचे हे बोलणे ऐकून अनेक जण आनंदी झाले आहेत. ‘ही बुद्धिमान स्टारकिड आहे’, ‘या वयात इतका समजूतदारपणा असणे हे तिच्यावर झालेले संस्कारच दर्शवते,’ ‘नव्या खूप हुशार आहे.’ अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहे. स्टारकीड असून देखील अनेकदा नव्या साधे जीवन जगताना दिसते. दरम्यान, नव्या आणि ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. अनेकदा यांना एकत्र पाहण्यात आले आहे.