दुबई विमानतळावर भारतीय कर्मचाऱ्याला अटक

दोन आंबे चोरण्याच्या आरोपावरून झाली अटक

दुबई  – प्रवाशांच्या बॅगेतून दोन आंबे चोरल्याप्रकरणी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय कर्मचाऱ्याला अटक करण्यात आले आहे. चोरीच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला सुरू आहे. 2017 साली दुबई विमानतळावर काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने प्रवाशांच्या बॅगेमधून दोन आंबे चोरले होते.

भारतात जात असलेल्या एका बॅगमधून आपण आंबे चोरल्याची कबुली देखील या तरुणाने दिली होती. “मला तहान लागली होती, मी पाणी शोधत होतो. त्यावेळी मी फळांची पेटी उघडली आणि त्यातले दोन आंबे मी खाल्ले अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.’ 2018 साली त्याची पोलिसांनी चौकशी केली आणि समन्स देऊन त्याला सोडण्यात आले होते.

मात्र, आता त्याला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. हा तरुण भारतीय प्रवाशांच्या बॅगा उघडून पाहत असल्याचे विमानतळावरिल सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. जर संबधीत तरुण चोरीच्या प्रकरणात दोषी आढळला तर त्याला तुरुंगवासही होऊ शकतो तसेच दोन आंब्यांची किंमत आणि दंडही त्याला चुकवावा लागू शकतो. या प्रकरणातील खटल्याचा निकाल 23 सप्टेंबरला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.